7 in stock upmrdl

श्रद्धावानांच्या प्रेमापोटी, त्यांच्या जीवनाला उचित दिशा मिळावी ह्या कळकळीपोटी सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंनी आपल्याला दिलेले आदिमातेच्या प्रेमकृपेचे आश्वासन. आई चण्डिकेची क्षमा, रक्षण आणि अर्थातच आधार ह्या ग‘ंथामधून आपल्यापर्यंत ते पोहोचवतात. श्रद्धावानाच्या मनातील सर्व प्रश्‍न, भय दूर करून भक्ती आणि सामर्थ्य दृढ करणारा हा सर्वश्रेष्ठ ग‘ंथ आहे. हा हितकारक बदल घडवणारा हा ग‘ंथ केवळ दिशादर्शकच नाही तर चण्डिकाकुलाच्या प्रेमामुळे ह्या दिशेने प्रवास करण्याची ताकदही देतो. आई चण्डिकेकडे नेणारा मार्ग सदैव खुला असतो, द्वार उघडे असते ही जाणीव करून देणारा हा ग‘ंथ आपल्या आतमधली अनेक बंद द्वारे अलगद उघडतो, आपल्या आतमधील अनेक अडथळे अलगद दूर करतो आणि ह्या आईच्या कृपेच्या मोकळ्या मार्गावर आणतो. असे जेव्हा घडते, तेव्हाच आईच्या जवळ नेणार्‍याखुल्या द्वाराची जाणीव होते. आणि हे कार्य हा ग‘ंथ, म्हणजेच सद्गुरुंचा कळकळीचा शब्द नक्कीच साध्य करतो.


5 in stock mvvhdl

यह परमपावन कार्य, जैसे इसका नाम दर्शाता है, माँ चंडिका के वात्सल्य का प्रत्यक्षीकरण है। सगुरु श्री अनिरुद्ध रचित यह कार्य भक्तों को केवल महिषासुरमर्दिनी माता चंडिका के आदर्श, कार्य और भूमिका से ही जोड़ने के लिए नहीं है, बल्कि उसके वात्सल्य से और उसकी हमारी संरक्षा के प्रति तत्परता से हमें अवगत कराना है।
वे चाहते हैं कि हम माता के प्रेम को जानें और उस शक्ति को पहचाने – वह शक्ति जो दुष्टता या बुराई से लड़ने की है, वह शक्ति जो नैतिक गुण और भक्ति के परिणामों से निश्चल आनंद की प्राप्ति कराती है। वह भले ही उग्र दिखती हो, वही सच्ची भक्त की सुरक्षा करती है और दुष्टों का नाश करती है। उस ने अपने उद्देश्य के मुताबिक – सच्चाई, पवित्रता, प्रेम और आनंद के नियमों की सुरक्षा हेतु यह भूमिका अपनाई है और वह इसकी प्राप्ति करती ही है।
गायत्री माता, महिषासुरमर्दिनी चंडिका माता और अनसूया माता एक ही है। विभिन्न स्तर के कार्यों के अनुसार माता रूप धारण करती है। जैसा कि सद्गुरु श्री अनिरुद्ध कहते हैं, यह कार्य माता की कीर्तियों का गुणसंकीर्तन है। यह एक ‘ज्ञान-गंगा’ है, और ‘भक्ति-भागीरथी’ है। यह कार्य ज्ञान एवं भक्ति के पथ पर चलकर भगवंत या यहाँ पर माता चंडिका के बोध के प्रति संतोष प्रदान करता है।
यह चिरकाल तक मार्गदर्शन करनेवाला यह ग्रन्थ सद्गुरु श्री अनिरुद्ध जी द्वारा लिखे गए उन के अन्य कार्यों की तरह भक्तों को प्रेम और आधार देता है।


6 in stock aecomd1

‘आनंदसाधना’ म्हणजे मर्यादामार्गावर परमेश्‍वरावर प्रेम करत वाटचाल करत असताना आनंद प्राप्त करून घेण्याचे विविध उपाय. ‘साधना’ म्हणजे खडतर जीवनपद्धती नसून ‘साधना’ म्हणजे उचित ध्येयाच्या दिशेने केलेले पुरुषार्थी प्रयास आणि ही अशी साधना नेहमीच सद्गुरुकृपेशी जोडणारी म्हणजेच सद्गुरुंच्या सोबत, त्यांच्या प्रेमासोबत जोडणारी – जीवनामध्ये सत्यप्रवेश घडणे म्हणजेच जीवनाचा प्रेमप्रवास आणि जीवनामध्ये आनंदसाधना.
‘पूजन’, ‘व‘त’, ‘उपासना’, ‘तपश्‍चर्या’ हे सर्व भगवंताच्या अधिकाधिक जवळ नेणारेच असतात. ह्या खंडामध्ये सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू सर्वसामान्यांना ह्या संकल्पनांचा खरा अर्थ समजावून सांगतात. शिवाय ‘पुरुषार्थगंगा’ ह्या विभागामध्ये सद्गुरु-परमत्म्याकडून म्हणजेच सर्वोच्च स्थानाकडून आपल्याकडे आलेला पवित्र व मंगल प्रेमगंगेचा असा प्रवाह, जो रोजच्या जीवनामध्ये आपल्याला सामर्थ्य आणि आनंदाची प्राप्ती तर करून देतोच शिवाय मर्यादामार्गावर दृढ करून एका बाजूने सद्गुरुंबरोबर जोडलेले ठेवतो व दुसर्‍या बाजूने कुटुंब, समाज, ह्या संस्थांचे घटक म्हणूनही आपला विकास घडवून आणतो. ह्या प्रवाहाच्या तीर्थाचे सेवनम्हणूनच सर्वार्थाने हितकारी!
तेव्हा ‘आनंदसाधना’ म्हणजे प्रेमप्रवास करत असलेल्या श्रद्धावानांसाठी आनंदाची साधना व हेच सत्य.


6 in stock pecomd1

प्रत्येक जीवाचा, किंबहुना ह्या सर्व विश्‍वाचाच प्रवास……… हे विश्‍व ज्याच्यामधून उद्भवले, ज्याच्यामध्येच ते लय पावते, ‘तो’च एकमेव अंतिम सत्य, प्रेमाचा मूळ स्रोत आणि आनंदाचाही. मानवजीवनाचा सर्वोच्च हेतूही तोच – भगवंत. ह्या भगवंताच्या दिशेने गती करणे हा प्रवास आणि भगवंत – सद्गुरु-परमात्मा आपले ध्येय.
आपला हा प्रवास भगवंताच्याच प्रेमाने प्रेरित असल्यास तो आनंदी आणि परिपूर्ण होतो. हे प्रेमच सामर्थ्यदायी, पुरुषार्थ व निर्भयता देते. भगवंताच्या प्रेमाची जाणीव प्रवास भक्तीमार्गावर दृढ करते.
‘प्रेमप्रवास’ हा ग‘ंथ ह्या अशाच सुंदर प्रवासाचे आश्‍वासन आहे कारण प्रत्येकाचा प्रवास भगवंताच्या (प्रेम)दिशेने आणि भगवंताच्या (प्रेम) सहवासातच करायचा असतो. हा प्रवास प्रत्येकाच्या जीवनामध्ये कसा घडू शकतो आणि त्यासाठी कोणते प्रयास घडावे लागतात ते सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू सहज-सोप्या शब्दांत आपल्याला सांगतात.
‘पूर्वरंगा’मध्ये हा भगवंत कसा अनंत, अपार आहे ते आपण समजून घेतो. ‘श्रीरंगा’मध्ये ह्या अनंत भगवंताचे अगदी प्रत्येक जीवावर असीम प्रेम असतेच, आपण त्याच्याजवळ जाण्यासाठी, भक्ती वाढवण्यासाठी काय प्रयास घ्यावे हे आपण समजून घेतो. – आपला विकास घडण्यासाठी अगदी आहारामध्ये करण्याचे बदलही आणि जीवनामध्ये वेळेचे, कार्याचे नियोजन ह्याबद्दलही मार्गदर्शन आपल्याला मिळते. ‘मधुफलवाटिका’ हा तिसरा विभाग म्हणजे वानरवीरांचे विश्रामस्थान – जेथली फळे ओज, सामर्थ्य व अर्थातच आनंद देणारी आहेत – म्हणजेच सद्गुरु श्रीअनिरुद्धबापू ज्या श्रीमद्पुरुसार्थाला ज्या ‘मधा’ची उपमा देतात, तशीच औषधी व मधुर.
‘प्रेमप्रवास’ आणि ‘सत्यप्रवेश’ हे एकेमेकांपासून वेगळे नाहीत आणि हे दोन्ही आनंददायीच आहेत.