4 in stock vvumdl

स्त्रियांसाठी आत्मबल हा परमपूज्य नंदाईच्या मार्गदर्शनाखाली चालत असलेला उपक्रम असून त्या अंतर्गत स्त्रियांचा विकास घडावा व त्यांना कुटुंब आणि समाज ह्या दोन्ही स्तरांवर आत्मविश्वासाने वावरता यावे ह्या हेतूने प्रशिक्षित करण्यात येते. गृहिणी असो की व्यवसाय सांभाळणारी स्त्री, स्वयंपाकघराची जबाबदारी ती प्रेमाने व यशस्वीरीतीने पार पाडतच असते. हे सुलभ व्हावे आणि तिला आनंदही मिळावा ह्या हेतूने काही पौष्टिक पण चविष्ट अशा पदार्थांच्या कृती संकलित केल्या आहेत.