Shreemad Pursharth Granthraj – Satyaprawesh Economy Edition (Marathi)

450

‘सत्यप्रवेश’ हा श्रीमद्पुरुषार्थ ग‘ंथराजाचा पहिला खंड असून सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्या जीवनकार्याला अनुसरून गृहस्थजीवनामध्ये राहून परमार्थ प्राप्तीची म्हणजेच नरजन्माचा सर्वश्रेष्ठ हेतू साध्य करण्याचा मार्ग दिग्दर्शित करतो. हा मार्ग आहे सामान्य जीवनामध्ये
भक्ती व निष्काम कर्मयोगाचा भक्ती व सेवेचा सहज समावेश, प्रवेश घडवून आणणारा; भगवंताच्या प्रेमाची जाणीव सतत जागृत ठेवणारा आणि म्हणूनच धैर्य, निर्भयता व पुरुषार्थ ही मूल्ये जीवनामध्ये बाणवणारा.
भक्ती, पुरुषार्थ ह्यांचा नेमका व खरा अर्थ समजावून समाजामध्ये रुजलेल्या चुकीच्या समजुती, अंध विश्‍वास आणि भय ह्यांपासून मुक्त करणारा व आनंदी आणि विवेकी गृहस्थ व सामाजिक जीवन घडवणारा.
‘सत्यप्रवेश’ एका अशा सुंदर क्षेत्राचे दरवाजे खुले करून देतो जिथे भगवंताच्या प्रेमाची सतत जाणीव हेच सर्वोच्च सत्य असतं व मग प्रत्येक श्रद्धावानाचा ह्या सुंदर क्षेत्री प्रवेश म्हणजेच ‘सत्यप्रवेश’ घडतो.

10 in stock

Categories: , ,