Dhoopashikha - Sai Flora (Set of 2 Boxes)
1 × ₹152
न्यायवैद्यक शास्त्र ह्याबाबत सामान्य माणसांना जरी प्रचंड उत्सुकता असली तरी त्यातील फारच थोडी माहिती असते. डॉ.वसुधा आपटे ह्या न्यायवैद्यक शास्त्रातील प्राध्यापिका व तज्ज्ञ आहेत. अनेक किचकट व अवघड वाटणार्या प्रकरणांमध्ये त्यांनी नायर हॉस्पिटल, मुंबई येथे काम करत असताना न्यायालयास मदत केली आहे. जे ज्ञान त्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना देत असत किंवा न्यायालयात त्या ज्ञानाच्या आधारे साक्ष देत असत, ते सर्व ज्ञान अतिशय साध्यासोप्या व सर्वसामान्यांना समजेल अशा पद्धतीने त्यांनी लिहून सर्वांना उपलब्ध करून दिलेले आहे. ह्या विषयावर इंग्रजीत अनेक पुस्तके आहेत परंतु मराठीमध्ये मात्र ह्या प्रकारचे हे पहिलेच पुस्तक असावे असे वाटते.