Aanjaneya e-SHOP
First Second Third Fourth

Details of selected Product

OUT OF STOCK

Shreeramrasayan (Marathi - Print Copy)
Publisher: Ashirwad Enterprises
Editor:
Author: Dr. Aniruddha Dhairyadhar Joshi
Publication Date: Sep 2007
Publication Type: Book
Price: Rs.150.00
Weight (including packaging material): 571.00 gms.

सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी लिहिलेला हा ग्रंथ म्हणजे प्रभू श्रीरामांचे चरित्र तर आहेच परंतु केवळ चिरित्रकथन नव्हे. हा ग्रंथ श्रीरामांची कथा सांगताना अनेक पातळ्यांवर, अनेक युगांमध्ये व प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मानवी जीवनामध्येही घडतच असते. आपल्या जीवनामध्ये श्रीरामांचे प्रेम, कर्तव्यदक्षता असते, परमात्म्याशी जोडलेली व शांती व भक्तीस्वरूप सीतामाई असते परंतु तिचे हरण करणारा वाईट प्रारब्ध, भय निर्माण करणारा अशुभ रावणही असतो आणि कुतर्करूपी संशयी मंथराही असते. ‘प्रेमप्रवास’ ह्या ग‘ंथामध्ये ह्याचा उ‘ेख येतो. ‘श्रीरामरसायन’ ह्या ग‘ंथाचे पठण करताना श्रीरामावताराचे कार्यच नव्हे तर त्याच्या ह्या मानवी अवताराचे म्हणजेच पूर्णत: मानवी पातळीवर राहूनही आदिमातेच्या आशीर्वादाने संकटांवर, अशुभावर अलौकिक जीवनकार्य साध्य करणार्‍या परमात्म्याचे मानवासाठी मार्गदर्शक ठरणारे हे प्रेरणादायी गुणसंकीर्तन असल्याची जाणीव होते. श्रीहनुमंताचे प्रभुश्रीरामांवरचे भावपूर्ण प्रेम, त्यांची भक्ती ह्याबद्दल तर आपण वाचतोच परंतु रावणराज्यातच राहिलेल्या रावणबंधू बिभीषणाच्या ठाम विश्‍वासाबद्दलही वाचतो. आणि म्हणून हा ग‘ंथ ‘रसायन’ आहे - सतत ऊर्जा पुरवणारा, क्षालन करणारा. ‘श्रीरामरसायन’ हे आम्हा श्रद्धावानांना वानरसैनिक बनण्याची प्रेरणा देते. एका बाजूने आमच्या जीवनामध्ये परमात्म्याचे मानवी पातळीवर राहण्याचा संकल्प पाळूनच केलेले हे मर्यादापालन आणि पूर्ण शुद्ध प्रेम आम्हाला लोभस वाटते आणि दुसर्‍या बाजूला त्याच्या ह्याच सर्वार्थाने मानवी रूप धारण करण्यामागचे आमच्यावरचे त्याचे अद्वितीय व शुद्ध प्रेम आम्हाला जाणवते. सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू म्हणतात दत्तगुरुंच्या चरणी त्यांनी अर्पण केलेली ही श्रीरामगुणसंकीर्तनाची पुष्पांजली आहे. गुणसंकीर्तन नेहमीच आनंददायी आणि तृप्तीदायी असते. असा हा अनेकविध हिताचे पैलू असणारा सर्वार्थाने सुंदर असा ग्रंथ. ह्या ग्रंथाचे अनखी एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या मधील चित्रे. अतिशय सूक्ष्म अशा पद्धतीने रेखांकित केलेली ही चित्रे एखादा क्षणामध्ये किंवा घटनेमध्ये खोल उतरवतात; ती घटना किंवा तो क्षण परिणामकारकपणे अगदी सजीवपणे मनात उभा करतात. आणि आपण जसे त्या क्षणात प्रवेश करतो तसेच तो क्षण, ती घटना आणि त्याच्या संपूर्ण हेतूसहित हा ग्रंथ आपल्या जीवनामध्ये प्रवेश करतो.

               


Login to add products to shopping cart or read sample copy Register if you are a new user and then Login to add products to shopping cart or read sample copy