Bharateey Prachin Balavidya (Marathi)

300

गेली अनेक वर्षे ’भारतीय प्राचीन बलविद्ये’ चे संशोधक- मार्गदर्शक व तज्ञ प्रशिक्षक म्हणून डॉ. अनिरूध्द धैर्यधर जोशी (अनिरूध्द बापू) (एम.डी.- मेडिसिन) कार्य करित आहेत. एक यशस्वी र्‍ह्युमॅटोलॉजिस्ट असलेल्या डॉ. अनिरूध्दांनी आपल्या अनेक वर्षांच्या व्यासंगाने संपादित केलेले भारतीय प्राचीन बलविद्येचे प्रकार त्यांनी आता सर्वांकरिता खुले केले आहेत. ’भारतीय प्राचीन बलविद्या’ हा विषय त्याच्या नावावरुन गूढ वटतो, ज्याचे कुतूहल व आकर्षण शतकानुशतके विदेशी लोकांनाही वाटत आले आहे. जोपर्यंत ही भारतीय प्राचीन बलविद्या आपल्या देशात आदर केला जात होता तोपर्यंत भारतदेशही वैभवाच्या शिखरावर होता. ह्या देशातील तरुणांना ह्या प्राचीन बलविद्येचे प्रशिक्षण जात्याच मिळत असल्यामुळे देशाकडे वाकड्या नजरेने बघण्याची कोण्त्याही शत्रुदेशाची हिंमत नव्ह्ती. पुढे कालौघात ह्या बलविद्यांचे आमच्या देशातील महत्व कमी कमी होऊन त्या हळूहळू लोप पावल्या अ त्यानंतर भारतदेश विदेशी आक्रमकांच्या तावडीत गेला. आज त्याच लोप पावलेल्या भारतीय प्राचीन बलविद्येचे प्रथम आचार्य रविंद्रसिंह मांजरेकर ह्यांना बापूंनी ही सर्व भारतीय प्राचीन बलविद्या स्वत: शिकवली. आता डॉ. अनिरूध्दांच्या मार्गदर्शनाखाली व आचार्य रविंद्रसिंहांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली ह्या भारतीय प्राचीन बलविद्याचे प्रशिक्षणवर्ग चालवले जातात. डॉ. अनिरूध्दांनी आचार्य रविंद्रसिंहांना दिलेल्या प्रशिक्षणवरुन व ह्या प्रशिक्षणवर्गात शिकवल्या जाणार्‍या बलविद्येच्या प्रकारांवरुन हे पुस्तक (टेक्स्टबुक) संकलित करण्यात आलेले आहे.